ED

ED : ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

1152 0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने मागणी केल्याप्रमाणे आता ईडीचे (ED) संचालक संजय कुमार मिश्रा यांना अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आला आहे. संजय मिश्रा यांना ईडीचे (ED) संचालक म्हणून 15 सप्टेंबरपर्यंत मुदतावाढ देण्यात आली आहे. मिश्रा हे फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या पुनर्रचनेच्या प्रकियेत सहभागी असल्याने राष्ट्रीय हितासाठी त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारने न्यायालयाकडे केली होती. संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ ईडी संचालक म्हणून 31 जुलै रोजी संपणार आहे.

तिसऱ्यांदा वाढवला कार्यकाळ
संजय मिश्रा यांची 19 नोव्हेंबर 2018 मध्ये दोन वर्षांसाठी ईडीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये मिश्रा पदमुक्त होणार होते. त्याआधीच मे महिन्यात त्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केली. याचा अर्थ त्यांनी निवृत्तीचे वय गाठले. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी त्यांचा कार्यकाळ दोनऐवजी तीन वर्षांचा करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्रीय दक्षता आयोग अधिनियम अंतर्गत एक सुधारणा अध्यादेश जारी केला. त्यानुसार, संजय मिश्रा यांचा कार्यकाळ 18 नोव्हेंबर 2023 रोजी संपणार होता. आता, त्याआधीच सुप्रीम कोर्टाने ही सुधारणा रद्द केली.

कोण आहेत संजय मिश्रा?
संजय मिश्रा हे 1984 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत.ऑक्टोबर 2018 मध्ये, संजय मिश्रा यांना ईडीचे संचालक बनवण्यापूर्वी त्यांना तीन महिन्यांसाठी अंतरिम संचालक बनवण्यात आले होते. मिश्रा यांना आर्थिक तज्ञ देखील म्हटले जाते आणि त्यांनी आयकराच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Share This News
error: Content is protected !!