Delhi Fire

Delhi Fire : दिल्लीतील AIIMS रुग्णालयाला भीषण आग

605 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग (Delhi Fire) लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पीटीआयने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. दिल्लीतील (Delhi Fire) एम्सच्या एंडोस्कोपी कक्षात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिल्ली अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग
दिल्ली एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सुमारे 11.54 वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे.

सर्व रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं
अग्निशमन दलाकडून सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे. सर्व रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. आग तीव्र असून धुराचे लोट वर उठताना दिसत आहेत. आपत्कालीन वॉर्डच्या वरची आग आटोक्यात आली आहे. रुग्णांना वॉर्डातून बाहेर काढण्यात आलं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share This News
error: Content is protected !!