Viral Video

बॅंकेत अचानक महिलेच्या अंगात आली देवी? केस मोकळे सोडून नाचू लागली (Video)

622 0

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) आपण अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. यामध्ये काही हसवणारे तर काही रडवणारे असतात. काही व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यांत पाणीदेखील येते. सध्या मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला बॅंकेत उड्या मारत नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर काही लोकांनी महिलेच्या अंगात देवी आल्याचा दावा केला आहे.

काय घडले नेमके?
शुक्रवारी गुना जिल्ह्यातील एका बॅंकेमध्ये लाडली बहना योजनेसाठी (Ladli Bahna Yojana) एक महिला आधार लिंक करण्यासाठी गेली होती. यावेळी ती अचानक विचित्र पद्धतीने उड्या मारायला लागली. तिने आपले केस मोकळे सोडून नाचायला सुरुवात केली. या महिलेचे हे रूप पाहून बॅंकेतील अधिकाऱ्यांसह तिथे उपस्थित महिला घाबरल्याचे दिसत आहे.

तर काही लोकांनी या महिलेच्या अंगात देवी आली होती, असा दावा केला आहे. या विचित्र घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला रांगेतून बाहेर येते आणि नाचायला सुरुवात करते, यावेळी ती मोठमोठ्याने काहीतरी बोलताना दिसत आहे. यावेळी ती नाचता नाचता अचानक खाली पडते आणि जमिनीवर हातपाय आपटायला सुरुवात करते. हा व्हिडीओ मध्यप्रदेश युथ काँग्रेसच्या ट्वीटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!