Rahul Gandhi

Women’s Reservation Bill : ‘या’ निवडणुकीपासून महिला आरक्षण ओबीसी कोट्यासह लागू करा; राहुल गांधींची मागणी

1150 0

नवी दिल्ली : लोकसभेत सादर करण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकावरील (Women’s Reservation Bill) चर्चेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आपले मत व्यक्त केले. महिला आरक्षण विधेयक हा बदल घडवून आणणारा असल्याचे त्यांनी म्हटले. महिला आरक्षण याच निवडणुकीपासून लागू करावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?
लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, सरकारने मांडलेले महिला आरक्षण विधेयक अपूर्ण आहे. ओबीसी महिलांसाठी आरक्षणाची तरतूद नाही. देशाच्या विकासात इतर मागासवर्गीयांचा मोठा वाटा आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव असलेले विधेयक तातडीने लागू करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणात ओबीसी मुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. ओबीसी कोट्याशिवाय असलेले हे विधेयक अपूर्ण असून ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणीदेखील राहुल गांधी यांनी यावेळी केली.

Share This News
error: Content is protected !!