ISRO

Chandrayaan 3 : चांद्रयान 3 च्या लँडिंगपूर्वी ISRO ने शेअर केला ‘हा’ नवा व्हिडिओ

1322 0

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’नं जुलै महिन्यात चांद्रयान (Chandrayaan 3) अवकाशात पाठवलं आणि त्या क्षणापासून या चांद्रयानावरच (Chandrayaan 3) सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं आहे. सध्या चांद्रयान चंद्राच्या पृष्ठापासून काही अंतरच दूर असून अवघ्या काही तासांनी ते चंद्रावर पोहोचणार आहे. ISRO चे वैज्ञानिक चांद्रयान 3 च्या लहानमोठ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. अवघ्या काही तासांमध्ये चांद्रयान चंद्रावर पोहोचणार आहे त्याअगोदर इस्रोनं एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

काय लिहिले ट्विटमध्ये?
सोशल मीडियावर अवघ्या 42 सेकंदांचा व्हिडीओ ट्विट करत इस्रोनं ही मोहीम निर्धारित वेळेतच पार पडत असल्याचं सांगितलं. सध्या मोहिमेशी संबंधित यंत्रणा नियमित चाचण्या पार करत आहे. शिवाय कोणत्याही व्यत्ययाशिवाय चांद्रयानाचा प्रवासही सुरु आहे. मिशन ऑपरेशंस कॉम्प्लेक्स (MOX) मध्ये पुरेशी उर्जा असून, मोहिमेसाठीचा उत्साहसुद्धा आहे. मोहिमेसंदर्भातील महत्त्वाची माहिती शेअर करताना इस्रोनं त्याचं थेट प्रक्षेपण भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे.

सध्या कुठे आहेत लँडर आणि रोवर?
लँडर आणि रोवर चंद्राच्या प्री लँडिंग कक्षेत परिक्रमण करत असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर आर.सी. कपूर यांनी दिली आहे. यावेळी इस्रोनं मागील मोहिमेत आलेल्या अपयशातून धडा घेत लँडर आणि रोवरला परिस्थितीला अनुसरूनच तयार केलं असून, लेग मॅकेनिजमवरही अधिक भर दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!