Calcutta_highcourt

Calcutta High Court : तरुण मुलींनी सेक्सच्या भावनेवर नियंत्रण ठेवावं, तर मुलांनी.., हायकोर्टाने तरुण पिढीला दिला मोलाचा सल्ला

1043 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकाता हायकोर्टाने (Calcutta High Court) एका प्रकरणात फैसला सुनावताना तरुण पिढीला सल्ला देताना म्हटले की, तरुण मुलींनी दोन मिनिटांच्या आनंदाऐवजी आपल्या लैंगिक इच्छेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्याचबरोबर तरुणांनी मुली आणि महिलांच्या स्वाभिमानाचा व त्यांच्या शारीरिक स्वातंत्र्याचा सन्मान ठेवावा. न्यायमूर्ती चित्तरंजन दास आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी सेन यांच्या खंडपीठाने एका तरुणाला मुक्त करताना ही टिपण्णी केली आहे. या तरुणावर एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. तिच्याबरोबर त्याचे प्रेम संबंध होते.

कोर्टाने लैंगिक शोषणापासून मुलांचे संरक्षण अधिनियम बाबतही चिंता व्यक्त केली. त्यामध्ये किशोरवयीन मुला-मुलींमध्ये सहमतीने केलेल्या सेक्सलाही लैंगिक शोषण मानले गेले आहे. कोर्टाने 16 वर्षाहून अधिक वयाच्या मुलामधील सहमतीने केलेल्या सेक्सला गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर कोर्टाने लैंगिक शिक्षणाचेही आवाहन केले.

कोर्टाने तरुणांना सल्ला देताना म्हटले की,एका किशोरवयीन पुरूषाचे कर्तव्य आहे की, त्याने महिलेची गोपनीयता व तिच्या शरीराच्या स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे.

Share This News
error: Content is protected !!