नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच देशात लोकसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपकडून नवा नारा (BJP New Slogan) देण्यात आला आहे. ‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं’ असा नवा नारा आता भाजपकडून दिला जात आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आलीये. भाजपने देखील लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली असून आता जोरदार नारेबाजीला देखील सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय.
भाजपने आतापर्यंत काय नारे दिलेत?
भाजपने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर दोनदा बहुमत मिळवले आहे. 2014 मध्ये पक्षाने ‘अच्छे दिन आने वाले हैं’ असा नारा दिला होता. तर 2019 मध्ये भाजपने ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ असा नारा दिला. ‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं’ असा नवा नारा भाजपकडून देण्यात आला आहे. 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजप हॅट्रीक मारणार असल्याचा दावा देखील पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?
Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा
Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला
Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा
Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या
Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल
Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू
Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती