मुस्लिम असल्याच्या संशयावरून भाजप नेत्याच्या मारहाणीत जैन वृद्धाचा मृत्यू

367 0

 

मध्यप्रदेशमधील रतलाम येथे धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका मानसिक रुग्णाला मारहाण करण्यात आली. मानसिक विकलांग असलेला हा व्यक्ती 65 वर्षीय वृध्द होता. या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मारहाणीचे कारण तर धक्का देणारे आहे. हा वृद्ध व्यक्ती मुसलमान असल्याच्या संशयवरून त्याला मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकारचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे की एक व्यक्ती या मानसिक रुग्णाला त्याचे नाव विचारत आहे आणि हा रुग्ण त्याचे नाव महमद सांगत आहे. या दरम्यान या रुग्णाला मारहाण केली जात आहे. त्यासोबतच आधारकार्ड दाखवण्यास सांगत आहे. दुर्दैव म्हणजे या मानसिक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.या प्रकारात धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारा हा भाजप नेता आहे. दिनेश कुशवाह हा भाजपा युवा मोर्चाचा नगराचा पदाधिकारी राहिलेला असून त्याने ही मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!