imran-khan

Imran Khan Bail: अखेर इम्रान खान यांना जामीन मंजूर

351 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिके इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यांना आता इस्लामाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात हायकोर्टाने त्यांना 2 आठवड्यांसाठी हा जामीन (Bail) मंजूर करण्यात आला आहे. तसेच खान यांना 17 मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अटक करू नये, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून (ISLAMABAD HIGH COURT) पाक रेंजर्सच्या पथकाकडून अटक करण्यात आली होती. इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आले होते. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जाळपोळदेखील करण्यात आली होती. यानंतर आता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!