Article 370

Article 370 : कलम 370 रद्द निकालाबाबत PM मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

503 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्‍यघटनेतील कलम 370 रद्द (Article 370) करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आज सर्वोच्‍च न्‍यायालयाने कायम ठेवला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या अध्यक्षतेखालील न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्‍या. बीआर गवई आणि न्‍या. सूर्यकांत यांच्‍या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणी ऑगस्‍ट आणि सप्‍टेंबर महिन्‍यात सलग 16 दिवस सुनावणी पार पडली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज सर्वोच्‍च न्‍यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत कलम 370 रद्दचा निर्णय कायम ठेवला आहे. यावर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?
SC च्या या निर्णयाने देशाच्या एकतेचे मूलतत्त्व दृढ कलम 370 रद्द करण्याबाबतचा भारतीय संसदेने 5 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मकदृष्ट्या कायम ठेवला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आजचा हा निकाल ऐतिहासिक आहे. हा निर्णय जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आपल्या बहिणी आणि भावांच्या आशा, प्रगती आणि एकतेच्या दृष्टीने आशादायक घोषणा आहे. न्यायालयाने प्रगल्भतेने आपला निर्णय देत, देशाच्या एकतेचे मूलतत्त्व दृढ केले आहे. भारतीय म्हणून या निर्णयाचे कदर करा, असेही पीएम मोदी म्हणाले.

जम्मू आणि काश्मीर मधील जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध मी जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या संयमी लवचिकता असलेल्या जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमची वचनबद्धता कायम आणि अटळ आहे. देशातील प्रगतीची फळे केवळ तुमच्यापर्यंतच पोहचवणे नाही तर कलम 370 मुळे यातना भोगलेल्या समाजातील सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित घटकांपर्यंत त्यांचे लाभ पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे, असेही पीएम मोदी म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली;डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

Farmer Suicide : धक्कादायक ! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या

Sanjay Raut : नवाब मलिक यांच्या बद्दल भूमिका घेतली मग प्रफुल पटेल यांच्या बद्दल का नाही? संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

Article 370 Verdict : कलम 370 रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!