aircraft crash

Army plane crashes : राजस्थानमध्ये लष्कराच्या विमानाचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्य (Video)

542 0

नवी दिल्ली : राजस्थानमधून (Rajsthan) एक मोठी बातमी समोर येत आहे. यामध्ये राजस्थानच्या हनुमानगडमध्ये (Hanumangad) लष्कराचे मिग-21 हे विमान (MiG-21 aircraft) कोसळून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हवाई दलाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

हाती आलेल्या माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटने ते शेतात कोसळवण्याचा प्रयत्न केला आणि ते शेतात बांधलेल्या एका घरावर कोसळले. यावेळी दोन्ही वैमानिकांनी वेळीच पॅराशूटच्या मदतीने आपला जीव वाचवला मात्र दुर्दैवाने हे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी असलेल्या घरातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच राजस्थानचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या विमानाने सुरतगड (Suratgad) येथून केले होते. हे विमात काही तांत्रिक बिघाडामुळे राजस्थानमधील हनुमानगढजवळ कोसळले. या विमानातील पायलट सुरक्षित असल्याची माहिती भारतीय वायुसेनेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!