Anantnag Encounter

Anantnag Encounter : दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड उझैर खानचा भारतीय सैन्यांकडून खात्मा

2342 0

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये (Anantnag Encounter) सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत भारतीय सैन्याला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाने लश्कर-ए-तोएबाचा दहशतवादी उझैर खान याला ठार केलं आहे. अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला. एका मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवाद्याचा असू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यासाठीची शोध मोहीम अनंतनागमध्ये अद्याप सुरूच आहे. अनंतनागमधील चकमकीत भारताचे चार जवानही शहीद झाले आहेत.

सध्या अनंतनागमध्ये सुरू असलेली चकमक संपली आहे. आता सुरक्षा दलांनी फक्त शोध मोहिमेवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे, याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी दहशतवाद्यांचा खात्मा झाला असता तरी त्यांच्याशी संबंधित गोष्टी तिथे आढळू शकतात. अनंतनागमधील नुकत्याच झालेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून चार जवान शहीद झाले आहेत. तिसऱ्या दहशतवाद्याच्या मृतदेहाचा शोध भारतीय लष्कराकडून सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!