Modi-Shah

‘कर्नाटकमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळणार’; अमित शाहांचा दावा

504 0

बंगळुरू : वृत्तसंस्था – येत्या 10 मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक (Karnataka Election) होणार आहे. तर, 13 मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने (BJP) हि निवडणूक जिंकण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी रविवारी कर्नाटकातील दोड्डाबल्लापुरा आणि बेळगावी येथे मेगा रोड शो केला.

यानंतर अमित शाह यांनी इथे पूर्ण बहुमताने डबल इंजिनचे सरकार स्थापन होईल असा दावा केला आहे. मागच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 110 जागा जिंकल्या होत्या, यावेळी तो आकडाही ओलांडणार देखील भाजपकडून सांगण्यात येत आहे. यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. बजरंग दलावर (Bajrang Dal) बंदी घालण्याच्या मुद्द्यवरून अमित शाह यांनी काँग्रेस (Congress) नेहमीच तुष्टीकरणाचं राजकारण करतं अशी टीका केली आहे.

यावेळी अमित शाह यांनी बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले आहे. बोम्मई आमचे मुख्यमंत्री आहेत. आता काय घोषणा करायची… पुढे कोण मुख्यमंत्री होणार हा नंतरचा विषय आहे. ते आजही मुख्यमंत्री आहेत असे अमित शाह यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी जगदीश आणि लक्ष्मण यांच्या काँग्रेसमधील प्रवेशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. हे दोघेही मोठ्या फरकाने निवडणूक हारत आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!