ठळक बातम्याराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

आफ्रिका : दोन बसचा भीषण अपघात; अपघातात 40 प्रवाशांचा मृत्यू; 87 जखमी, सेनेगल देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

आफ्रिका : आफ्रिकेतील सेनेगलमध्ये दोन बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 40 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला तर 87 प्रवासी जखमी झाले आहेत. बसचा टायर फुटल्यामुळे हा भीषण अपघात घडला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आफ्रिकेतील सेनेगल या देशांमध्ये रविवारी पहाटे सव्वा तीन वाजता राष्ट्रीय मार्ग एक वर हा भीषण अपघात घडला या घटनेमध्ये 40 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 87 प्रवासी जखमी झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष यांनी या 40 लोकांच्या मृत्यूमुळे तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

बसची आसन क्षमता साठ लोकांची होती. ही बस मोरीटाण्याच्या सीमेजवळील रोसोला येथे जात असताना नक्की बस मध्ये किती प्रवासी होते याची माहिती मिळाली नाही. जखमींना काफिर मधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बसचा टायर फुटल्यामुळे झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.