Aditya-L1 Solar Mission

Aditya-L1 Solar Mission: चंद्रानंतर आता सूर्याची बारी; कुठे पहाल Aditya-L1 चं थेट प्रक्षेपण?

887 0

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोच्या (ISRO) आज पहिल्या सूर्य मोहिमेचा शुभारंभ (Aditya-L1 Solar Mission) होणार आहे. आदित्य एल1 (Aditya L1) हे यान शनिवार (2 सप्टेंबर) रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा (Sriharikota) सतीश धवन अवकाश केंद्रातून या ग्रहाचे प्रक्षेपण (Aditya-L1 Solar Mission) करण्यात येणार आहे. पीएसएलव्ही (PSLV) रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल1 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

कुठे पहाणार मिशन आदित्यचं थेट प्रक्षेपण?
आदित्य एल1 च्या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण हे इस्रोच्या अधिकृत बेवसाईटवर करण्यात येणार आहे. तसेच तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून देखील थेट प्रक्षेपण पाहू शकता. डीडी वाहिनीवर देखील या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सकाळी 11.20 मिनिटांनी या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

 

पाच टप्प्यात पूर्ण होणार सूर्याचा प्रवास
आदित्य एल1 हे पाच टप्प्यात सूर्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहे. या प्रवासासाठी जवळपास 125 दिवसांचा कालावधी लागेल. पहिल्या टप्प्यात पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल 1 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या कक्षेत विस्तारले जाईल. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण प्रभावाच्या बाहेर हे यान तिसऱ्या टप्प्यात काढले जाईल. चौथ्या टप्प्यात हे यान सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु करेल. तर पाचव्या टप्प्यात एल1 पाईंटवर पोहोचणार आहे.

Share This News
error: Content is protected !!