Aditya L1

Aditya L-1 Mission: मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी लॉंच होणार आदित्य एल -1

1205 0

श्रीहरिकोटा : इस्रोचं मिशन आदित्य L1 (Aditya L-1 Mission) हे 2 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे.श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल 1 हे मिशन लाँच करण्यात येणार आहे. नुकतीच इस्रोने चांद्रयान मोहीम यशस्वी करुन इतिहास रचला आहे. या मोहिमेनंतर आता सूर्यावर जाण्याची तयारी इस्रोकडून करण्यात येत आहे. इस्रोचं आदित्य एल1 मोहिम ही सर्वात कठिण मोहिमांपैकी एक आहे.

या मोहिमेसंदर्भात ‘भारताची आता सूर्यावर जाण्याची तयारी सुरु आहे.’ त्यांनी म्हटलं आहे की, ‘भारताचं मिशन आदित्य एल1 हे सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चांद्रयानावर इस्रोचं लक्ष होतं. पण त्याच सोबत इतर काही मोहिमांची तयारी देखील इस्रोकडून करण्यात येत होती.’ अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली आहे.

काय आहे मिशन आदित्य एल 1?
भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल ठेवल्यानंतर ही मोहीम हाती घेतली आहे. तसेच, भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. आदित्य L-1 अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कणांचा प्रसार आणि प्रदेश इत्यादी समस्या समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती प्रदान करेल, असा इस्रोच्या शास्त्रज्ञांना विश्वास आहे. यामुळे आता भारताची ही मोहीम यशस्वी होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!