Football

फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 9 जणांचा मृत्यू

530 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एल साल्वाडोर स्टेडियममध्ये (El Salvador Stadium) फुटबॉल सामन्यादरम्यान (Football Match) एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये (Stampede) 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

स्थानिक स्पर्धा पाहण्यासाठी फुटबॉल चाहत्यांनी साल्वाडोर स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कुस्कॅटलान स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती नॅशनल सिव्हिल पोलिसांनी (National Civil Police) ट्विटरवरून दिली आहे.

अलियान्झा आणि एफएएस या दोन संघांमधील सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी ही गर्दी केली होती. या सामन्याच्या दरम्यान चाहत्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला अचानक चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये 9 जणांना आपला जीव गमवावा लागला.

Share This News
error: Content is protected !!