narendra modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

663 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केली.

दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी अर्थात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरणं केलं जातं. यंदा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (Narendra Modi) जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्याला मोदी उपस्थितीत राहणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी शरद पवारांना देखील आमंत्रण देण्यात येणार असल्याचं रोहित टिळकांनी सांगितलं आहे. त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide