Zika Virus

Zika Virus : पुण्यानंतर पंढरपुरात सापडला झिकाचा रुग्ण; मुंबईवरून परतताच पडला होता आजारी

1214 0

सोलापूर : पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे. 23 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी एकादशीसाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यादरम्यान एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा (Zika Virus) संशयित रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर पुण्यामध्ये उपचार सुरु आहेत. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

पंढरपूर शहरी भागात एक रुग्ण माहिम वेस्ट इथं वास्तव्याला गेला होता. पंढरपूरला परतल्यानंतर सर्दी ताप खोकला अंगदुखीची लक्षणे आढळली. तपासणीनंतर पुढील उपचारासाठी पुण्यात दाखल केले. त्यांना संशयित झिका नावाचा व्हायरल आजार झाल्याचे निदान झाले. यामुळे पंढरपूरमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून पुण्यातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा हिवताप विभागाने दिली आहे.

झिका व्हायरसची लक्षणे
डोळे लाल होणे, प्रचंड डोकेदुखी, ताप ,सांधेदुखी,अंगदुखी, डोकेदुखी, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. ज्या लोकांना या विषाणुने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये शरीरावर लाल रंगाचे चट्टेदेखील दिसतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!