VIJ VITARAN

जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी 7 फूट पाण्यातील पोलवर चढून विद्युत पुरवठा केला सुरळीत…पाहा (VIDEO)

267 0

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचा कहर सुरु असल्याने मारेगाव तालुक्यातील महागाव तलाव तुडुंब भरलाय. अशात खंडित असलेला विद्युत पुरवठा कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता सात फूट पाण्यात उतरत पोलवर चढून सुरळीत करण्यात आला आहे.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पंधरा गावं अंधारात होती. सात फूट पाणी असताना जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. मार्डी 33 केव्ही उपकेंद्रमधून 11 केव्ही कुंभा विद्युत वाहिनी बंद होती. मुसळधार पावसामुळे या वाहिनीवरील 15 गावांचा वीज पुरवठा बंद पडला होता. त्यामुळे या भागातील कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी पणाला लावून विद्युत पुरवठा सुरू केला आहे.

Share This News
error: Content is protected !!