Top News Marathi Logo

वाईन बाबतचा निर्णय राज्याला कुठं घेऊन जाणार ? अण्णा हजारे यांचा सवाल

285 0

केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्णयावरून राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्यात येत असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

आता यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही सरकारचा निर्णय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं की, हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे.

तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे.
सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत.

केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे असल्याचं म्हणत अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

Share This News

Related Post

ईडी ची टायपिंग मिस्टेक ; 5 चे केले 55 लाख

Posted by - March 4, 2022 0
मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात अटक केली. त्यावेळी मलिक…

मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व वॉरंट जारी

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत याच्या विरोधात अटक वॉरंट जारी…
Maharashtra Weather

Maharashtra Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान विभागाने जारी केला नवा अलर्ट

Posted by - June 14, 2024 0
मुंबई : मान्सूनची महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) दमदार वाटचाल सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान आज पुन्हा…

अहमदनगर : धक्कादायक…! रुग्णालयाच्या गेटवरच महिलेची प्रसुती ; राज्यातील ग्रामीण भाग आजही आरोग्य सुविधेपासून दूर …

Posted by - August 3, 2022 0
अहमदनगर , (टाकळी काझी) : अहमदनगर जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेने राज्यातील ग्रामीण भागाला मिळणाऱ्या आरोग्य सुविधेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.…
Navi Mumbai Crime

Navi Mumbai Crime : आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याला अटक; नवी मुंबईमधील घटना

Posted by - June 24, 2023 0
नवी मुंबई : पनवेल शहरामध्ये अल्पवयीन मुलीला धमकी देऊन (Navi Mumbai Crime) तिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार घडला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *