मुंबई : चक्रीवादळ मिचॉन्ग अखेर तामिळनाडूला सोडून आंध्र किनारपट्टीवर धडकले आहे. या दरम्यान (Weather Update) त्याचा वेग ताशी 90 ते 110 किमी इतका होता. मिचॉन्ग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी 1.40 च्या सुमारास आंध्र प्रदेशातील बापटला भागात धडकलं. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोनासिमा, काकीनाडा, कृष्णा, बापटला आणि प्रकाशम यासह आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांतील 9,454 नागरिकांना 211 मदत शिबिरांमध्ये आधीच सुरक्षितपणे हलवण्यात आलं. या चक्रीवादळाचा मोठा फटका हा तामिळनाडू राज्याला बसला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रातदेखील या चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मिचॉन्ग चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून मंगळवारी देण्यात आला आहे.आज चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वातावरण देखील ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द
Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर
Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस
Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या
Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या