Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस

1858 0

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाचे आगमन (Maharashtra Weather Update) झाले आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुणे आणि कोकणासह राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसणार आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पुणे, सातारा, अहमदनगर,नाशिक, दक्षिण कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!