मुंबई : आजही राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज (Weather Update) वर्तवण्यात आला आहे. पालघर वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट?
पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, अमरावती, वाशिम, नागपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. इथे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट?
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील उर्वरित इतर सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन
Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला