‘शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या’ मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंना निरोप; संभाजीराजे पक्षप्रवेश करणार ?

372 0

शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ वर या’ असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पाठवला आहे.
संभाजीराजे आणि शिवसेना नेत्यांमध्ये हॉटेल ट्रायडंटमध्ये महत्वाची बैठक पार पडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना फोन करून उद्या दुपारी 12 वाजता शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर येण्याचा निरोप दिल्याची माहिती समोर आली आहे.राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आग्रही राहिली. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.संभाजीराजे हे ‘वर्षा’वर जातील का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत संभाजीराजे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!