Sangli News

Sangli News : मिरजमध्ये युवा अभियंत्याने गणपतीसाठी साकारला 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा

797 0

सांगली : सांगलीमधील (Sangli News) मिरज या ठिकाणी सुदन जाधव या अभियंत्याने घरातील गणपतीसमोर बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे. थर्मोकाल आणि पुठ्ठ्यांच्या माध्यमातून बनविलेली आकर्षक, नक्षीदार व कोरीव 12 मंदिरे लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना आणि त्याचा महिमा देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या देखाव्याने गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सुदन जाधव हा प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात आपल्या कल्पकतेतून नाविण्यपूर्ण देखावे साकारत असतो. त्याने मागच्या दोन वर्षी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील बारा बलुतेदार आणि शिवरायांचे अपरिचीत शिलेदार या विषयावर ऐतिहासिक देखावे साकारले होते.

सुदनने साकारलेल्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये सोमनाथ (वेरावळ, गुजरात), मल्लिकार्जून (श्रीशैल्यम, आंध्र प्रदेश), महाकालेश्वर (उजैन, मध्य प्रदेश), ओंकारेश्वर (माधांता, मध्यप्रदेश), वैजनाथ (झारखंड), रामेश्वर (रामेश्वरम् तमिळनाडू), नागेश्वर (द्वारका, गुजरात), घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र), केदारेश्वर (केदारनाथ, उत्तराखंड), त्र्यंबकेश्वर (नाशिक, महाराष्ट्र), भीमाशंकर (भीमाशंकर, पुणे) या मंदिरांचा समावेश आहे. त्याने सदरची सर्व मंदिरे व शिवलिंगांच्या प्रतिकृती हुबेहुब साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

Share This News
error: Content is protected !!