Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : …नाहीतर खूप जड जाईल, जरांगे पाटलांनी सांगितला आंदोलनाचा पुढचा प्लॅन

1295 0

जालना : मराठा आरक्षणचा मुद्दा दिवसेंदिवस पेटताना दिसत आहे. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा 6 वा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे तरीदेखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. यावेळी जरांगे पाटील हे भाषण करण्यासाठी उभे राहताना अचानक कोसळल्याचे देखील पाहायला मिळाले. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला इशारादेखील दिला.

काय म्हणाले मनोज जरांगे?
‘माझा उपचार हा फक्त आरक्षण आहे. अर्धवट आरक्षण दिले तर हात लावणार नाही, जीआर घेणार नाही. पण चर्चे साठी मार्ग मोकळा आहे. आम्ही त्यांचे सरक्षण करणार पण ते संरक्षण एकदाच देऊ. मला बोलता येईल तोपर्यंत या नाहीतर नंतर येऊन काय फायदा नाही. आता 1 तारखेपासून तिसरा टप्पा सुरू करणार आहोत ते खूप जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर जालन्यात जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. प्रकृती खालावली आहे. उपस्थितीत गावकऱ्यांनाही यावेळी रडू कोसळलं.

Share This News
error: Content is protected !!