ST Driver

एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेअरिंग महिलेच्या हाती! (Video)

437 0

भारतीय महिलेने चूल आणि मूल याच्या पलीकडे जात अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, अवकाश अशा पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रातही महिलांनी आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. दरम्यान राज्यातील सामन्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एसटीच्या (ST) इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (State Road Transport Corporation) इतिहासात आता पहिल्यांदा एका महिला ड्रायव्हरने बस चालविली आहे. या ऐतिहासिक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या महिलेचे नाव अर्चना अत्राम असे आहे. या चालक महिलेने पहिल्यांदाच बसचे स्टेअरिंग हातात घेत प्रवाशांना सुरक्षितपणे आपल्या थांब्यावर पोहोचविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. अर्चना अत्राम या काही पहिल्याच एसटी बस चालक नाहीत, पण या मार्गावर एसटी बस चालवणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेने बस चालवली आहे. एसटी सुरु झाल्याच्या तब्बल 75 वर्षांनी महिलेच्या हातात एसटीचे स्टेअरिंग देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने ही बस चालवली आहे.

महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीदेखील महिला चालकाचा एसटी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करून त्यांचे अभिनंदन केलं आहे. अर्चना यांचा बस चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!