shinde and uddhav

बाकी चुकलं पण सरकार वाचलं !

466 0

मुंबई : आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल दिला. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा देणारे निर्णय
भरत गोगावले यांची प्रतोदपदी झालेली निवड बेकायदेशीर
मीच खरी शिवसेना असा दावा कोणीही करू शकत नाही.
बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही.
राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे, त्यांनी कोणत्याही पक्षाला सपोर्ट करणे चुकीचे असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.
सुनील प्रभू योग्य प्रदोद सुप्रीम कोर्टाचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलासा देणारे निर्णय
16 आमदारांच्या अपात्रेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे
जुने सरकार परत आणण्याची शक्यता कोर्टाने फेटाळली.
महाराष्ट्रात शिंदे- भाजप सरकार राहणार

Share This News
error: Content is protected !!