Talathi exam 2023

Talathi exam 2023 : तलाठी परीक्षेत सावळा गोंधळ; पेपर उशिरा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना सहन करावा लागला मनस्ताप

386 0

नागपूर : तलाठी भरती परीक्षेत (Talathi exam 2023) सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात (Talathi exam 2023) नुकसान होत आहे. सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला आहे. प्रवेश न मिळाल्याने परीक्षार्थी संभ्रमात आहेत. सध्या यावरुन राज्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे.

काय घडले नेमके?
राज्यातील तलाठी परिक्षार्थींचा पेपर अखेर दीड तास उशीराने सुरु होणार आहे. सर्व्हर सुरळीत झाल्याने परिक्षार्थींना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला आहे. सकाळी 9 ते 11 या वेळात पेपर होता, पण आता हा पेपर उशिराने सुरू होणार आहे. दुपारी 12.30 वाजताचा पेपर सुद्धा उशिराने सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपनींच्या भोंगळ कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.

सकाळी 7.30 ला परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर बोलवण्यात आलं होतं. मात्र त्यांना हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभे रहावे लागले.राज्यात सर्वत्र तलाठी पदासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा अद्याप पर्यंत सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे.

Share This News
error: Content is protected !!