Sushma Andhare

सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांसाठी लाटल्या चपात्या (Video)

436 0

पुणे : सोमवारी हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. पुणेकरांनी मोठ्या जल्लोषात या दोन्ही पालख्यांचे जंगी स्वागत केले. या पालखी सोहळ्यात प्रत्येक जण आपल्या परीने जे शक्य होईल तशी वारकऱ्यांची सेवा करताना दिसत आहेत. या पालखी सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील वारकऱ्यांची सेवा केली. त्यांनी वारकऱ्यांसाठी चपात्या लाटल्या. याचा एक व्हिडीओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
सोमवारी आषाढीवारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात आगमन झाले. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी वारकऱ्यांची सेवा केली. त्यांनी वारकऱ्यांसाठी चपात्या लाटत्या. त्यांनी याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, त्या अतिशय चपळायीने पोळ्या लाटताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!