आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अधिवेशनात ‘हे’ मुद्दे गाजणार

450 0

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून रणनिती आखली जात आहे.

अधिवेशनात ‘हे’ मुद्दे गाजणार

1) नवाब मलिक यांचा राजीनामा

2) किरीट सौमय्यांवर झालेले आरोप

3) ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण

4) नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरील कारवाई

5) आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचारचे आरोप

6) केंद्रीय यंत्रणांचा वापर

7) 12 निलंबीत आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रश्न

8) कोरोना काळातील भ्रष्टाचार

9) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा निलंबित प्रश्न

10) शेतकऱ्यांची वीजबील माफी

11) पीक विमा

केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानुसार राज्य सरकार आता काय तरतुदी करते यावर लक्ष ठेवून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!