राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी !

184 0

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. परंतु राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी अवघ्या 22 सेकंदातच अभिभाषण आटोपतं घेतलं.

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घोषणाबाजीमुळे संबोधित करणे कठीण झाल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संबोधन आटोपते घेऊन विधिमंडळाचे सभागृह सोडले. दरम्यान राज्यपालांनी सभागृह सोडल्यानंतर या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदार आक्रमक झाले आहेत. सभागृहातील घोषणाबाजी नंतर सभागृह सोडणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असून, “राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव”अशी घोषणाबाजी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात आली. तसेच राज्यपालांनी महाराष्ट्र आणि घटनेचा अपमान केला आहे असा आरोप सत्ताधार्‍यांकडून करण्यात आला.

महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.

Share This News
error: Content is protected !!