मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात कमी पैश्यात आणि सुखकर प्रवासासाठी एसटीचा (ST News) वापर केला जातो. लाखो प्रवासी या एसटीने प्रवास करत असतात. प्रवास करत असताना अनेकवेळा प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरून वाद होताना दिसतो. मात्र आता हा वाद मिटण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाने प्रवास करणाऱ्यांसाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी प्रवाश्यांना आता थेट मोबाईलमधून फोन पे,गुगल पे सारख्या अॅपचा वापर करून तिकीट काढता येणार आहे.
देशात सध्या डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढली असून अगदी भाजीपाल्या पासून तर विमानाचे तिकीट काढण्यासाठी यूपीआय पद्धतीचा वापर केला जातो.आता हीच सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अर्थात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनाही मिळणार आहे. वाहकाजवळ असलेल्या तिकिटांच्या मशीनमध्येच आता क्यू आर कोड जनरेट होणार असून तुमच्या मोबाईल मधल्या कुठल्याही डिजिटल पेमेंटच्या अॅपद्वारे तो स्कॅन करून तुम्ही तिकीट काढता येणार आहे.
सुट्टया पैश्यांवरून होणारे वाद टाळण्यासाठी आणि ग्राहकांच्या सोयीसाठी महामंडळाने ही सुविधा सुरु करण्याचे ठरवले आहे. सध्या मात्र मोजकेच प्रवाशी याचा लाभ घेत आहेत. राज्यातील सर्वदूर पोहोचणाऱ्या एसटीमध्ये ही सुविधा सुरु झाली तर गावागावातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात
Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन
Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील
Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे
IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर
Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी
Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या
Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका