गडचिरोली : सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही ठिकाणी अजूनही काही लोक पाऊसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांचं नुकसान झालं आहे. त्यातच आता पावसामुळे एटसी (ST Video) बसचं छप्पर गळत असल्याची घटना समोर आली आहे. या परिस्थितीमुळे बस ड्रायव्हरला एका हातात छत्री आणि एका हातात स्टेअरिंग पकडण्याची वेळ आली आहे.
हे प्रकरण गडचिरोली मधील आहे. ज्यामध्ये एसची बसच्या गळतीमुळे ड्रायव्हरला मोठ्या संकटांना तोंड देत बस चालवाली लागली. पाऊस सुरू असताना बसमध्ये छत गळत असल्याने चक्क चालक बस मध्ये छत्री घेऊन बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ST Video : एसटीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर; हातात छत्री धरून बस ड्रायव्हरला चालवावी लागली बस pic.twitter.com/xUVb1xwExb
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) August 25, 2023
या नव्या व्हिडिओमुळे अहेरी आगारातील भंगार बस गाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी याच आगारातील छप्पर उडालेल्या बसचा एक व्हिडीओ समोर आला होता. तसेच अजून एका व्हिडिओमध्ये एका हातात स्टेरिंग आणि एका हातात वायफर फिरवत असल्याचा बसचा व्हिडिओ राज्यभर तुफान चर्चेचा विषय ठरला. आता हा नवा व्हिडीओ पाहून लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.