ST Bus Video

ST Bus Video : पहिल्याच पावसात एसटीला गळती; प्रवाशांनी बसमध्येच छत्री उघडून केला प्रवास

622 0

पालघर : राज्यात मान्सूनने ठिकठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह ठाण्यातदेखील मुसळधार पावसाने हजेरी (ST Bus Video) लावली. या पावसामुळे पाणी साचून बऱ्याच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या सोशल मीडियावर पावसाचे पाणी साचल्याचे अनेक व्हिडीओसुद्धा (ST Bus Video) व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक एसटी बसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हयरल (ST Bus Video) होताना दिसत आहे. यामध्ये एसटी बसला गळती लागल्याचं दिसत असून प्रवासी छत्री उघडून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एसटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारावर आता प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पालघरच्या सफाळे आगारातील बसचा हा व्हिडीओ आहे. बसमधून प्रवास करताना छतावरून पाणी गळती सुरू झाल्यानं पावसाच्या धारा लागल्या. यामुळे बसमधील प्रवाशांची तारांबळ उडाली. यामुळे बसमध्येच प्रवाशांना छत्री उघडून प्रवास करावा लागला.

Video Viral : मुग्धा वैशंपायनच्या लग्नावर प्रसिद्ध अभिनेत्याने दिलेल्या ‘त्या’ प्रतिक्रियेचा व्हिडीओ व्हायरल

हा संतापजनक व्हिडिओ (ST Bus Video) समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच नादुरुस्त बस सेवेसाठी का पाठवली जाते? असा सवाल देखील संतप्त नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!