Adv. Hasan Patel : माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक ; वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

643 0

लातूर : आज सकाळी ऍड. हसन पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 38 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे . हसन पटेल हे माजी आमदार पाशा पटेल यांचे सुपुत्र होते.

ऍड.हसन पटेल हे मुंबई हायकोर्ट मध्ये वकिली करत होते. कोरोना काळामध्ये ते लातूरला आले . आणि त्यानंतर आरोग्याच्या तक्रारीमुळे ते लातूरमध्ये होते. दरम्यान त्यांच्यावर लातूर मधील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणजोत मालवली.

हसन पटेल यांचा दफनविधी शुक्रवारी दुपारी दोन वाजता औसा तालुक्यातील लोदगा येथे फिनिक्स शैक्षणिक संकुलाजवळ करण्यात आला.  त्यांच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ आहेत.

Share This News
error: Content is protected !!