Gautami Patil Dance

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; पोलिसांकडून बंद पाडण्यात आला शो (Video)

905 0

सोलापूर : गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. आपल्या नृत्याच्या जोरावर गौतमी पाटील महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचली आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होत असते. काही दिवसांपूर्वी अशाच एका कार्यक्रमादरम्यान छत कोसळून 10 ते 20 जण जखमी झाले होते.

यानंतर आता सोलापूरच्या बार्शीमध्ये असाच गोंधळ निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी हा शो बंद पाडला आहे. या कार्यक्रमात वेळेची मर्यादा ओलांडल्यामुळे पोलिसांना हा शो बंद पाडावा लागला. यानंतर तिकडच्या माणसांनी एकच गोंधळ घालायला सुरुवात केली.

Gautami Patil Video : डान्स सुरू असतानाच पत्र्याचं शेड कोसळलं, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामधील घटना

यामुळे गौतमीच्या नृत्याचा आस्वाद घेता न आल्यामुळे बार्शीकर रसिक नाराज झाले आहेत. कार्यक्रमाला झालेली गर्दी आणि प्रेक्षकांची नाराजी बघत पोलिसांनी बंदोबस्तामध्ये गौतमी पाटील हिला त्या ठिकणाहून बाहेर काढले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide