Eknath Shinde And Devendra Fadanvis

अडीच लाखात मिळणार हक्काचं घर; राज्य सरकारकडून झोपडीधारकांना मोठे गिफ्ट

685 0

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका (Mumbai Municipal Elections) तोंडावर आल्याने राज्य सरकारकडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना (Slum Area) मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना सशुल्क घर मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो झोपडीधारकांना याचा फायदा होणार आहे.

काय आहे नेमका निर्णय ?
राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या 2 लाख 50 हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

यासाठी काय आहेत अटी?
राज्य जारी केलेल्या निर्णयानुसार, या नव्या योजनेतील लाभार्थी झोपडपट्टीवासियांच्या अटी आणि शर्थी निश्चित करण्यासाठीची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!