Silver Pomplet Fish

Silver Pomplet Fish : पापलेटला मिळाला राज्य माशाचा दर्जा; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

1446 0

महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु आहे तर राज्य पक्षी हरियाल आहे. हे तर सर्वांनाच माहित आहे. मात्र, आता राज्य मासा म्हणून (Silver Pomplet Fish) खवय्यांच्या ताटात महत्त्वाचं मान मिळवणाऱ्या एका माशाला दर्जा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सोमवारी ही घोषणा केली खोल समुद्रात मिळणारा रुपेरी पापलेट मासा याला आता राज्य मासा म्हणून मान मिळणार आहे.

सिल्व्हर पॉम्पलेट अर्थात पापलेट माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून दर्जा मिळाला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पापलेट माशाला राज्य मासा म्हणून अधिकृत दर्जा मिळावा यासाठी मागणी केली जात होती. अनेक मच्छिमार संस्थानी मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे यासंबंधित मागणी केली होती. आता पापलेट माशाला राज्य मासा म्हणून दर्जा मिळाल्याने मच्छिमारांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यात सिल्व्हर पॉम्फ्रेटच्या उत्पादनात होत असणारी घट ही चिंताजनक आहे. त्यामुळं या प्रजातीचे जतन करण्याच्या दृष्टीने मच्छिमार संघटनांनी ही मागणी उचलून धरली होती. राज्य सरकारने या मत्स्य प्रजातीचे महत्त्व जाणून टपाल तिकिटही जारी केले आहे. माशाला अधिकृत राज्य माशाचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण होण्यास मदत मिळेल, अशी भावना मच्छिमारांकडून व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!