Krupal Tumane

ठाकरे गटाचे इतर खासदारही फुटणार; खासदार कृपाल तुमाने यांचा गौप्यस्फोट

610 0

नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे 13 खासदार निवडून येणार नाहीत, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याने राजकीय मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता राऊत यांचा हा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे (Krupal Tumane) यांनी फेटाळला आहे. आमच्या गटाचे सर्वच्या सर्व 13 खासदार विजयी होतील, असा दावा कृपाल तुमाने यांच्याकडून करण्यात आला आहे. एवढेच नाहीतर ठाकरे गटाचे उरलेले खासदारही शिंदे गटात येणार आहेत. या खासदारांसोबत आमची बैठक झाल्याचा गौप्यस्फोटदेखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता तुमाने यांच्या या विधानाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके काय म्हणाले कृपाल तुमाने ?
ठाकरे गटाकडे असलेले खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईत ठाकरे गटाच्या त्या खासदारांसोबत आमची बैठक झाली, ते शिंदे गटात यायला तयार आहेत. लवकरच त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला जाणार आहे. ठाकरे गटाचे काही आमदारंही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोटदेखील त्यांनी यावेळी केला. या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कृपाल तुमाने यांनी काल ठाकरे गटाचे खासदार आमच्यासोबत येण्यास तयार आहेत असा दावा केला होता. त्यामुळे आता ठाकरे गटाचे ते खासदार कोण? असा सवाल करण्यात येत आहे. हे खासदार मुंबईतील आहेत की मुंबई बाहेरचे असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे. शिंदे गटासोबत खरंच हे खासदार बैठकीला उपस्थित होते का? की शिंदे गटाकडून पुडी सोडली जात आहे, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!