gautami patil

Gautami Patil Video : डान्स सुरू असतानाच पत्र्याचं शेड कोसळलं, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामधील घटना

605 0

संभाजीनगर : डान्सर गौतमी पाटील हिचे नाव सध्या राज्यात तुफान गाजत आहे. तिच्या डान्सच्या कार्यक्रमाला तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत तुफान गर्दी होत असते. तिच्या कार्यक्रमादरम्यान अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आता अशीच एक घटना संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) घडली आहे. संभाजीनगरमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरु असताना तिच्या कार्यक्रमात पत्र्याचं शेड कोसळून (The sheet shed collapsed) अनेक तरुण जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
संभाजीनगर जिल्ह्यातील महालगावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटीलचा कार्यक्रम असल्यामुळं परिसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यावेळी गौतमीला पाहण्यासाठी काही तरुण स्टेजसमोरील पत्र्याच्या शेडवर चढले. काही वेळ झाल्यानंतर अचानक पत्र्याचं शेड खाली कोसळलं. त्यामुळं दहा ते वीस लोक एकमेकांच्या अंगावर पडले.

या घटनेत काही तरुणांना किरकोळ मार लागला आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात छत कोसळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

Share This News
error: Content is protected !!