उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार होते.
याचवेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष आणि नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
मात्र या पत्रकार परिषदेच्या अगोदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष राज्यसभा खासदार शरद पवार यांचा अजित पवार यांना फोन आल्यानं ही पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द करण्यात आली असून अजित पवार यांचे पुढील दोन तासातील सर्व कार्यक्रम कार्यक्रम रद्द करण्यात आले असून आज सायंकाळी पुण्यातील वडगाव शेरी याठिकाणी होणाऱ्या सभेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.