Swine Flu

Swine Flu : नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव; महिलेचा मृत्यू

494 0

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये स्वाइन फ्लुचा (Swine Flu) शिरकाव झाला आहे. स्वाइन फ्लुची लागण झाल्यानंतर सिन्नरच्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, आणखी तीन रुग्ण समोर आले आहेत. स्वाइन फ्लुचे रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा आणि लहान मुलांमध्ये जुलाब उलटी अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन, मनपाने केले आहे. तसंच, काळजी घेण्यासही मनपाने सांगितले आहे.

स्वाइन फ्लुची लक्षणे?
ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी,खोकला, थकवा, लहान मुलांमध्ये जुलाब उलटी यासारखी लक्षणे आढळतात.

स्वाइन फ्लु होऊ नये म्हणून ‘या’ गोष्टी करा
वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा
पौष्टिक आहार घ्या
लिंबू आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या आहारात वापरा.
धूम्रपान टाळा
पुरेशी झोप व विश्रांती घ्या
भरपूर पाणी प्या
खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवा.

स्वाइन फ्लु होऊ नये म्हणून ‘या’ गोष्टी टाळा
कोणत्याही व्यक्तीसोबत हात मिळवू नका
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका
संशयित रुग्णांच्या संपर्कात जाऊ नका
लक्षणे आढळल्यास मुलांना शाळेत पाठवू नका.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Raj Kundra : मोठी कारवाई ! राज कुंद्राची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ED कडून जप्त

Sanjay Raut : संजय राऊतांची नवनीत राणांवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले ‘बाई तुम्हाला खुणावेल अन्…’,

Supriya Sule : जोरदार शक्तिप्रदर्शनासह सुप्रिया सुळेंनी भरला आपला उमेदवारी अर्ज

Supriya Sule : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं 55 लाखांचं कर्ज; शपथपत्रातून माहिती उघड

Loksabha : शिर्डीत वंचितचा मविआला मोठा धक्का ! ‘या’ महिला नेत्याला उमेदवारी जाहीर

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!