Heavy Rain

Heavy Rain : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

555 0

सातारा : राज्यात सध्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्येदेखील या पावसाने (Heavy Rain) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्या ठिकाणच्या मुलांना आणि नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

काही दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मुसळधार पावसानं नद्या- ओढे- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ओढ्याचं पाणी बोंद्री गावच्या रस्त्यांवरील फरशी पुलावरुन गेलं आहे. मोठ्या पावसात सतत हा पूल पाण्याखाली जात असल्याने संपर्क तुटत आहे‌.

हा पूल पार करत असताना 2 वर्षांपूर्वी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला 2 वर्षे उलटली तरीही या ठिकाणची परिस्थिती अजूनही तशीच आहे. आजही पुलावर पाणी (Heavy Rain) आल्याने शालेय विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

Share This News
error: Content is protected !!