Satara News

Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

335 0

सातारा : साताऱ्यातून (Satara News) एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्याला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाकपासून 6 किलोमीटर अंतरावर होता. सुदैवाने यामध्ये कोणतेही जीवितहानी झालेली नाही.

नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही
कोयना धरण परिसरात हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पण, या भूकंपामुळं कोयना धरण आणि परिसराला मात्र कोणताही धोका नसल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. कोयना धरण आणि नजीकच्या परिसरामध्ये वारंवार भूकंपाचे हादरे जाणवतात पण, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन यंत्रणाकडून करण्यात येत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpri Chinchwad : पिंपरीमध्ये आयटी तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार; CCTV फुटेज आलं समोर

Sanjay Raut : मुख्यमंत्री राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग; संजय राऊत यांची टीका

Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!