Police beat

संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसाची वाहनचालकाला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण (Video)

1059 0

संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भर रस्त्यात एका वाहतूक पोलिसाची दादागिरी पाहायला मिळाली. देशांतर्गत कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असते. मात्र, अनेकदा हे पोलीस आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
यामध्ये तुम्ही पाहू शकता कि, वाहतूक पोलीस एका दुचाकी चालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण (beating) करताना दिसत आहे. ही घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. त्या तरुणाने सिग्नल जंप केला म्हणून त्याला ही मारहाण करण्यात आली.

या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून वाहतूक पोलिसांना मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला? असा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस या अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!