Anil Parab

Sai Resort Case : अनिल परब यांना दिलासा ! साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रातून नाव वगळले

259 0

रत्नागिरी : दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी ईडीने (ED) जे आरोपपत्र दाखल केले होते त्यातून आता आरोपी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे नाव वगळण्यात आले आहे. यामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जरी परब यांचं नाव आरोपी म्हणून या आरोपपत्रातून वगळण्यात आले असले तरी या आरोपपत्रात अनिल परब यांच्या नावाचा वारंवार उल्लेख आला आहे. त्यामुळे या प्रकरणी ईडी पुरवणी आरोपपत्र दाखल करणार आहे.

तपास सुरु आहे
तसेच या आरोपपत्रात साई रिसॉर्ट प्रकरणी अद्याप सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. तर दुसरीकडे सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांचेदेखील नाव या आरोपपत्रात सामील आहे. तसेच अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) 12 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे.

किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वी या साई रिसॉर्ट प्रकरणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांकडून करण्यात आला होता. या आरोपांमुळे अनिल परब यांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!