Mukesh Ambani

Mukesh Ambani : खळबळजनक ! मुकेश अंबानींना आला धमकीचा ई-मेल; म्हणाले ‘आम्हाला 20 कोटी द्या, अन्यथा…’

1074 0

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना ई-मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जर तुम्ही आम्हाला 20 कोटी दिले नाहीत तर तुम्हाला ठार मारु असं या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे. मुकेश अंबानींच्या सुरक्षा प्रमुखाने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

काय लिहिण्यात आले इमेलमध्ये?
“जर तुम्ही आम्हाला 20 कोटी दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला ठार करु. आमच्याकडे भारतातील बेस्ट शूटर्स आहेत”. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबरला हा ई-मेल पाठवण्यात आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्याचं नाव शादाब खान आहे. मुकेश अंबानी यांचं मुंबईतील निवासस्थान अँटिला येथील सुरक्षा प्रमुखाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मुंबई पोलिसांनी मागच्या वर्षी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला धमकी देत टार्गेट करणाऱ्या बिहारमधील एका व्यक्तीला अटक केली होती. या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचं निवासस्थान अँटिला आणि एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिली होती. आता पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!