RBI

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

3191 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान RBI ने एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. या बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तुमचेही या बँकेत खाते असल्यास तुम्हीदेखील आता पैसे काढू शकणार नाहीत. ही बँक नेमकी कोणती आहे त्याबद्दल जाणून घेऊया…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील उल्हासनगर इथल्या कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध घातले आहेत. आर्थिक परिस्थिती पाहता हे निर्बंध लादण्यात आले आहेत. बँकेची स्थिती चांगली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. बँकेची बिकट आर्थिक स्थिती पाहता बँकेवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News
error: Content is protected !!